Share

जीएसटी इमारतीच्या भूमिपूजनाचे श्रेय अजित पवारांना- मुख्यमंत्री ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज (२ एप्रिल) जीएसटी भवनाच्या इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी बोलत असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधकांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच जीएसटी इमारतीच्या भूमिपूजनाचे श्रेय उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) यांना आहे, असेही ठाकरे म्हणाले.

यावेळी बोलत असतांना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,‘अजित पवारांनी आणि सरकारने या इमारतीच्या जागेसाठी पाठपुरावा केला, अनेक परवानग्या मिळवल्या. त्यामुळे जीएसटी इमारतीच्या भूमिपूजनाचे श्रेय अजित पवारांना आहे.’ तसेच कर संकलनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकाच राज्य आहे, ही अभिमानाची बाब असून त्यासाठी सर्व अधिकारी-कर्मचारी आणि अजित पवार यांना लाख लाख धन्यवाद,असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, खासदार राहूल शेवाळे, विधान परिषद सदस्य आर. तमिल सेलवन, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!