🕒 1 min read
मुंबई : दरवर्षी १ एप्रिल हा दिवस जगभरात ‘एप्रिल फुल डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना मूर्ख बनवत असतो. लहान असो किंवा मोठा सर्वच जण एकमेकांना विविध युक्त्या लढवून या दिवशी एप्रिलफुल बनवतात. दरम्यान, नेहमीच राजकीय नेते वेगवेगळ्या मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. याच पार्श्वभूमीवर आज एप्रिल फुलच्या निमित्ताने आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीका केली आहे.
यासंदर्भात अमोल मिटकरींनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘जागतिक एप्रिल फुल दिवसाच्या निमित्ताने….’ असे कॅप्शन देत त्यांनी कमळ चा एक फोटो शेअर केला आहे.
दरम्यान, इंग्लंडचे राजा रिचर्ड द्वितीय आणि बोहेमियाची राणी अॅनी यांनी ३२ मार्च १३८१ रोजी त्यांच्या लग्नाची घोषणा केली. परंतु, ३२ मार्च ही तारीख नसतेच. राजा-राणीने लग्नाची खोटी माहिती देऊन लोकांना मूर्ख बनवले होते, तेव्हापासून हा दिवस ‘एप्रिल फूल डे’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.
महत्वाच्या बातम्या
- “राहुल गांधींना ना भाजपच्या या एजन्सींचा धाक आहे ना…”, नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा
- “अच्छा सिला दिया तूने…”, महागाईवरून नितीन राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- ट्वीटरवर होतोय ‘BoycottHimalaya’ ट्रेंड; नेमके कारण काय?
- “आमचे कुटुंब राजकारणातील असले तरी माझे आजोबा क्रिकेट…”, सुप्रिया सुळेंनी करून दिली ‘ती’ आठवण
- कोरोना काळातील निर्बंध गुढीपाडवा सणापासून पूर्णपणे हटवण्यात येणार- राजेश टोपे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
