🕒 1 min read
मुंबई : घरगुती गॅस सिलेंडर महागला असून सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसला आहे. फक्त इतकेच नाही तर पेट्रोल आणि डिझेलमध्येही ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. या मुद्द्यावरून आता राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे वारे वाहू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात नितीन राऊत यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘अच्छा सिला दिया तूने लोगों को मतों का….’ तसेच यासोबत त्यांनी एक कार्टून शेअर केले आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा तबला वाजवतांना दिसत असून ‘धीरे-धीरे कीमतें बढाना है, हद से गुजर जाना है…’, असे ते म्हणतांना दिसत आहे.
दरम्यान, यापूर्वी देखील महागाईच्या मुद्द्यावरून टीका करत ‘२०१४- ४१० रु तसेच २०२२- ९५० रु, ७ वर्षात एलपीजी सिलेंडरची किंमत ६४० रुपयांनी वाढली. त्याचे श्रेय घेण्यासाठी ते कधीच पुढे येणार नाही’, असे नितीन राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- “राहुल गांधींना ना भाजपच्या या एजन्सींचा धाक आहे ना…”, नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा
- “…पण कुस्तीसारख्या खेळांमध्ये आहारासाठी स्पॉन्सर्स शोधावे लागतात”, सुप्रिया सुळेंनी केल्या केंद्राकडे ‘या’ मागण्या
- “…तर प्रशासनाचीही दुरवस्था लक्षात येते”, ‘त्या’ घटनेवरून राऊतांची टीका
- “आमचे कुटुंब राजकारणातील असले तरी माझे आजोबा क्रिकेट…”, सुप्रिया सुळेंनी करून दिली ‘ती’ आठवण
- कोरोना काळातील निर्बंध गुढीपाडवा सणापासून पूर्णपणे हटवण्यात येणार- राजेश टोपे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
