Share

…हे मरणयातनांचे ओझे कधीतरी उतरणार आहे का?- संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : नुकतीच मध्य प्रदेशमध्ये आरोग्य विभागाची परिस्थिती किती वाईट आहे हे दाखवणारी एक घटना घडली. वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने एका ८० वर्षीय वृद्ध महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, या मुद्द्यावर असता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य केले आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘देशातील ग्रामीण-आदिवासी भागातील आरोग्य सेवेची हेळसांड हा काही आपल्याकडे नवीन प्रश्न नाही. रुग्णाला किंवा मृतदेहाला खांद्यावर घेऊन मैलोगणती करावी लागणारी पायपीटही तेथील गरीबांच्या पाचवीलाच पुजली आहे. मध्य प्रदेशातील रिवा येथील अशाच घटनेने ही दुरवस्था पुन्हा चव्हाटय़ावर आणली इतकेच. ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’, असे कविवर्य सुरेश भट यांनी म्हटले आहे. मात्र येथे तर मृत्यूनंतरही मरणयातनांपासून सुटका नाही, अशी या दुर्दैवी जिवांची दुरवस्था आहे. त्यांच्या खांद्यावरील हे मरणयातनांचे ओझे कधीतरी उतरणार आहे का?.’

पुढे ते म्हणाले की,‘आपल्या देशाने ७० वर्षांत केली नाही तेवढी प्रगती गेल्या सहा वर्षांत केली, असे दावे सध्याचे सत्ताधारी नेहमीच करीत असतात. पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचे दावे केले जात आहेत. महागाई दिवसेंदिवस नवनवे विक्रम करीत असली तरी आपला देश आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने कशी वेगाने वाटचाल करीत आहे, असे चित्रदेखील रंगविले जात आहे. मात्र या सर्व फुग्यांना टाचणी लावणारी आणि या चित्रातील रंग धुसर करणारी एक हृदयद्रावक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. या दुर्दैवी घटनेचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, ‘मध्य प्रदेशातील रिवा येथे आजारी महिलेला १० किलोमीटर अंतरावरील आरोग्य केंद्रात उपचारासाठी न्यायचे होते. परंतु त्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. शेवटी या महिलेच्या मुलींनी आजारी आईला खाटेवर झोपवून १० किलोमीटर पायपीट करीत आरोग्य केंद्रात आणले. मात्र तोपर्यंत आजारी महिलेचा मृत्यू झाला होता. पुन्हा या महिलेच्या मुलींची फरफट येथेच थांबली नाही. मृतदेह परत गावाकडे नेण्यासाठीही त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे आईचा मृतदेहही त्यांना खाटेवर टाकूनच पायी परत नेण्याची वेळ आली. त्यातही संतापजनक बाब अशी की, संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना त्यात काहीही गैर वाटले नाही. त्यांच्या संवेदना जाग्या झाल्या नाहीत. उलट या घटनेला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. सोशल मीडियावरून विनाकारण या घटनेला ‘व्हायरल’ केले जात आहे, असे तारे या महाशयांनी तोडले.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!