🕒 1 min read
मुंबई: आम्ही पराभवाच्या भीतीने निवडणुका घेत नाही असे जे म्हणत आहेत, तेच घाबरले आहेत. घाबरणे हा आमचा स्वभाव नाही. विजयाचा एवढा आत्मविश्वास असेल, तर ६ महिन्यांनी निवडणुकीला कशाला घाबरता. असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah target on Congress) यांनी कॉंग्रेसला लगावला होता. तर आज महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी ट्वीट करत भाजपला टोला लगावला आहे.
“आमचे नेते राहुल गांधी यांना ना भाजपच्या या एजन्सींचा धाक आहे ना त्यांच्या सैनिकांना. सत्याला कधीही भीती वाटत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.”, असे ट्वीट नाना पटोले यांनी केले आहे. दरम्यान मविआ सरकारमधील नेत्यांवर ईडीच्या धाडी पडत असल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेते यावरून सतत मविआ नेत्यांना टार्गेट करत आहे. तर काँग्रेसने महागाई, इंधनदरवाढ या मुद्यांवरून भाजपला निशाण्यार धरले आहे.
काल दिल्लीत तसेच महाराष्ट्रात इंधन दरवाढ याविरोधात काँग्रेसने आंदोलन करत निषेध नोंदवला. दरम्यान काँग्रेसचे खासदार आणि वेगवेगळ्या राज्यांमधील नेते पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन करत आहेत. मागील दहा दिवसांमध्ये नऊ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवण्यात आली. याचा थेट फटका गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना बसत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
“आमचे कुटुंब राजकारणातील असले तरी माझे आजोबा क्रिकेट…”, सुप्रिया सुळेंनी करून दिली ‘ती’ आठवण
“…तर प्रशासनाचीही दुरवस्था लक्षात येते”, ‘त्या’ घटनेवरून राऊतांची टीका
…हे मरणयातनांचे ओझे कधीतरी उतरणार आहे का?- संजय राऊत
Economic Crisis : श्रीलंका आर्थिक संकटात; सरकारविरोधात रस्त्यांवर उतरुन नागरिकांचा रोष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
