🕒 1 min read
मुंबई: ट्वीटरवर सध्या ‘BoycottHimalaya’ हा ट्रेंड खूप व्हायरल होत आहे. अनेक दिग्गजांनी या ट्रेंडला फॉलो केल्याचे दिसून येत आहे. अभिनेता परेश रावल यांनीही ट्वीट करत ‘BoycottHimalaya’ असे म्हटले आहे. यामागे नेमके कारण काय, याबाबत आता चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान (३१ मार्च) गुरुवारी हिमालया ड्रग कंपनीच्या ‘हलाल पॉलिसी’चे छायाचित्र ट्विटरवर व्हायरल झाले. त्यात असे म्हटले आहे की, “आमची उत्पादने इस्लामिक कायदा/शरियाचे पालन करतात आणि इस्लामिक कायद्यांतर्गत कोणत्याही निषिद्ध घटकांपासून मुक्त आहेत. आम्ही हलाल प्रमाणपत्राशी संबंधित सर्व बाबींसाठी जबाबदार राहण्यासाठी विविध शाखांमधील वरिष्ठ अधिकारी (मुस्लिमसह) यांचा समावेश असलेला अंतर्गत हलाल व्यवस्थापन संघ स्थापन केला आहे.” ,यामुळे काही ट्विटर वापरकर्त्यांनी हिमालयाच्या उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी केली. तसेच ट्विटरवर #BoycottHimalaya ट्रेंड होऊ लागला आहे.
दरम्यान व्हायरल होणाऱ्या फोटोबाबत अजून तरी अधिकृत माहिती मिळालेली नाहीये. मात्र ट्वीटर वापरकर्ते #BoycottHimalaya ट्रेंड फॉलो करताना दिसून येत आहेत. व्हायरल होणारा फोटो कितपत खरा आहे, यासंदर्भात अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
महत्वाच्या बातम्या:
“आमचे कुटुंब राजकारणातील असले तरी माझे आजोबा क्रिकेट…”, सुप्रिया सुळेंनी करून दिली ‘ती’ आठवण
“अच्छा सिला दिया तूने…”, महागाईवरून नितीन राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
“राहुल गांधींना ना भाजपच्या या एजन्सींचा धाक आहे ना…”, नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा
कोरोना काळातील निर्बंध गुढीपाडवा सणापासून पूर्णपणे हटवण्यात येणार- राजेश टोपे
“…तर प्रशासनाचीही दुरवस्था लक्षात येते”, ‘त्या’ घटनेवरून राऊतांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
