🕒 1 min read
मुंबई : राज्यात मागील दोन वर्षांपासून कोरोना संक्रमण काळात अनेक निर्बंध लावण्यात आले होते. राज्य सरकारच्या काल (३१ मार्च) पार पडलेल्य मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान या निर्बंधांसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना दिली आहे.
यावेळी बोलत असतांना राजेश टोपे म्हणाले की,‘राज्यातील कोरोना काळातील निर्बंध गुढीपाडवा सणापासून पूर्णपणे हटवण्यात येणार असून निर्बंध हटवण्यात आले असले तरीदेखील काळजी घेतलीच पाहीजे,’ असे आवाहन टोपे यांनी केले. तसेच लोकांनी स्वत:ची आणि सार्वजनिक ठिकाणी इतर लोकांची काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे. यासाठी मास्क घालणे हे ऐच्छिक असले तरी आवश्यक असल्याचे टोपे यांनी सांगितले. त्यामुळे गुढीपाडवा तसेच त्यावेळी निघणाऱ्या शोभायात्रा आपल्याला अत्यंत उत्साहाने साजऱ्या करता येतील.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यासोबतच येणारे इतर सण पूर्ण उत्साहाने साजरे करता येतील. जगात अनेक देशांमध्ये मास्क मुक्ती करण्यात आली आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार, टास्क फोर्सशी केलेल्या चर्चेअंती हा निर्णय घेतला आहे.’ तसेच आरोग्य विभागातील ४० ते ५० वयोगटातील शासकीय कर्मचाऱ्यांना दोन वर्षात एकदा पाच हजार रूपयांच्या मर्यादेपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आवश्यक चाचण्या करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ५० ते ६० वयोगटातील कर्मचाऱ्यांना दरवर्षी या चाचण्या करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी १०५ कोटी रुपयांचा निधी मान्य करण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- …हे मरणयातनांचे ओझे कधीतरी उतरणार आहे का?- संजय राऊत
- “…पण कुस्तीसारख्या खेळांमध्ये आहारासाठी स्पॉन्सर्स शोधावे लागतात”, सुप्रिया सुळेंनी केल्या केंद्राकडे ‘या’ मागण्या
- “…तर प्रशासनाचीही दुरवस्था लक्षात येते”, ‘त्या’ घटनेवरून राऊतांची टीका
- “आमचे कुटुंब राजकारणातील असले तरी माझे आजोबा क्रिकेट…”, सुप्रिया सुळेंनी करून दिली ‘ती’ आठवण
- IPL 2022: रवी बिश्नोईच्या सुपर थ्रोवर ऋतुराज रन आऊट ; अवघ्या १ धावांवर माघारी परतला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
