🕒 1 min read
कोलकाता : भाजप आणि टीएमसीच्या आमदारांमध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभेत आज तुफान हाणामारी झाली. एकमेकांचे कपडे फाडले. या हल्ल्यात टीएमसीचे आमदार असित मजुमदार जखमी झाले असून त्यांना कोलकाताच्या पीजी रुग्णालयातील वुडनवर्ड वॉर्डात भरती करण्यात आले असल्याची माहिती आहे.
सकाळी सभागृह सुरु होताच भाजप आमदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. विरोधी पक्षनेते आणि भाजपचे आमदार शुभेंद्रू अधिकारी यांनी बीरभूम नरसंहाराप्रकरणी करण्यात आलेल्या मदतीची घोषणा विधानसभेच्या बाहेर का केली? विधानसभेत मदतीची घोषणा का केली नाही? असा सवाल विधानसभा अध्यक्षांना केला. अधिकारी यांच्या या सवालानंतर या हत्याकांडावर विधानसभेत चर्चा घडवून आणण्याची भाजपने जोरदार मागणी केली.
मात्र, विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे भाजप आमदार वेलमध्ये उतरले. त्यावर विधानसभा अध्यक्ष भडकले. तुम्ही रोज काही ना काही बहाना शोधून विनाकारण विधानसभेत हंगामा करत असता. अचानक या गोष्टी करण्याचं काहीच औचित्य नाहीयेस, असं विधानसभा अध्यक्ष बिमान बनर्जी म्हणाले. मात्र, भाजप आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून वेलमध्ये उतरून जोरजोरात नारेबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे तृणमूलचे आमदारही वेलमध्ये उतरले. त्यामुळे दोन्ही सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि हाणामारी झाली.
महत्वाच्या बातम्या –

