Share

विधानसभेत झाली तुफान हाणामारी; आमदारांनी एकमेकांचे कपडेही फाडले!

Published On: 

कोलकाता : भाजप आणि टीएमसीच्या आमदारांमध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभेत आज तुफान हाणामारी झाली. एकमेकांचे कपडे फाडले. या हल्ल्यात टीएमसीचे आमदार असित मजुमदार जखमी झाले असून त्यांना कोलकाताच्या पीजी रुग्णालयातील वुडनवर्ड वॉर्डात भरती करण्यात आले असल्याची माहिती आहे.

टीएमसीचे आमदार शौकत मोल्ला आणि महिला आमदार महिलांनी विधानसभेच्या सुरक्षा रक्षकांच्या साथीने भाजपच्या आमदारांवर हल्ला चढवल्याचा आरोप भाजप नेते शुभेंद्रू अधिकारी यांनी केला आहे. आमदार मनोज टिग्गा यांचे कपडे फाडण्यात आले आहेत. तर नरहरी महतो यांना जमिनीवर पाडून मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हाणामारी झाली त्यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सभागृहात नव्हत्या. त्या दौऱ्यावर आहेत. परंतु त्यांना खबर देण्यात आली आहे.

बंगाल विधानसभेचे अध्यक्ष बिमान बॅनर्जी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. जे काही झालं ते दुर्देवी आहे. आमदार विधानसभेच्या नियमांचा अभ्यास करत नाहीत. त्यांना विधानसभेचं महत्त्व कळत नाही. विधानसभेत हंगामा करणं हाच त्यांचा हेतू आहे, असं बिमान बॅनर्जी यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या –

इम्रान खानचे ‘तीन मित्र’ ऐनवेळीला फिरले; आता PAK पंतप्रधानांची खुर्ची टिकणे कठीण!

IPL 2022 : “मला आयपीएलमध्ये धोनीसारखं यश मिळवायचंय”, हार्दिक पंड्याची प्रतिक्रिया!

“आम्हाला तुमचा अभिमान…”, वर्ल्डकपचं स्वप्न भंगलेल्या टीम इंडियासाठी विराट काय म्हणाला ते एकदा वाचाच!

एक दोन नव्हे तर चक्क ११ लाखांची पैठणी! आदेश भाऊजी येणार ‘महामिनिस्टर’ घेऊन वाहिनींच्या भेटीला

काँग्रेसची जागा प्रादेशिक पक्ष घेणं लोकशाहीसाठी चांगलं नाही- नितीन गडकरी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!