मुंबई : कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळा सुरू आहे. हे सर्वांनाच माहीत आहे. बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणसाठी यावेळी हा पुरस्कार सोहळा खूप खास होता कारण तिला टाइम 100 इम्पॅक्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ज्याची माहिची स्वतः अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दीपिकाने लिहिलं की, ‘मला वाटतं सोमवारच्या सकाळची सुरुवात ही चांगली झाली आहे. दीपिका पदुकोणने मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात खूप काम केलं आहे.
2015 पासून मानसिक आरोग्य क्षेत्रात करत आहे काम
दीपिका स्वतः डिप्रेशनची शिकार झाली होती. त्यानंतर तिने मेंटल हेल्थ फाउंडेशन सुरू केलं. दीपिकाने स्वतः सांगितलं होतं की, ‘मी 2014 साली डिप्रेशनची शिकार झाले होते आणि त्यानंतर मी मानसिक आरोग्य फाउंडेशनची स्थापना केली’. या दिशेने काम करण्यासोबतच दीपिका मानसिक आरोग्याबाबतही मोकळेपणाने बोलत असते. ऑस्कर पुरस्कार 2022 बद्दल बोलायचं झालं तर, बऱ्याच काळापासून, कोरोना विषाणूमुळे, जगभरातील पुरस्कार शो आणि कार्यक्रमांच्या तारखा पुढे ढकलल्या जात होत्या.
अशा परिस्थितीत, मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेरीस 94 व्या अकादमी पुरस्काराचे आयोजन रविवार, 27 मार्च 2022 रोजी करण्यात आलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
इम्रान खानचे ‘तीन मित्र’ ऐनवेळीला फिरले; आता PAK पंतप्रधानांची खुर्ची टिकणे कठीण!
IPL 2022 : “मला आयपीएलमध्ये धोनीसारखं यश मिळवायचंय”, हार्दिक पंड्याची प्रतिक्रिया!
“आम्हाला तुमचा अभिमान…”, वर्ल्डकपचं स्वप्न भंगलेल्या टीम इंडियासाठी विराट काय म्हणाला ते एकदा वाचाच!
एक दोन नव्हे तर चक्क ११ लाखांची पैठणी! आदेश भाऊजी येणार ‘महामिनिस्टर’ घेऊन वाहिनींच्या भेटीला
काँग्रेसची जागा प्रादेशिक पक्ष घेणं लोकशाहीसाठी चांगलं नाही- नितीन गडकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

