Share

“…आधीच विरोधी पक्षनेत्यांचे ‘पंटर्स’ या कार्यक्रमात गोंधळ घालतात”, अहिल्यादेवी होळकर स्मारक वादावरून राऊतांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: अहल्यादेवी होळकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा २ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यावर पडळकर यांनी आक्षेप घेत, काल (२७ मार्च ) स्मारकाचे लोकार्पण करण्यासाठी सांगलीत हजारो कार्यकर्त्यांसह दाखल झाले होते. मेढपाळांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. यासाठी त्यांनी ढोल ताशांच्या गजरात मोठी मिरवणूक काढली होती.यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut ) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

शरद पवारांसारखा नेता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या सांगलीतील स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्यास जाण्याआधी विरोधी पक्षनेत्यांचे ‘पंटर्स’ या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. हे कसले आले गुड गव्हर्नन्स? अशी टीका संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केली आहे.

दरम्यान गोपीचंद पडळकर यांच्यासह सदाभाऊ खोत, सुधीर गाडगीळ आणि भाजप कार्यकर्ते यांनी ‘येळकोट-येळकोट जयमल्हार’ अशा घोषणा देत पोलिसांचा अडथळा पार करून प्रतिबंधित क्षेत्रात घुसले.यावेळी आंदोलकांशी पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा सुरू असताना स्मारकावर ड्रोनच्या मदतीने फुलांचा वर्षाव करण्यात आला. या प्रकरणी ड्रोन मालकांसह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पुष्पवृष्टीसाठी वापरण्यात आलेले ड्रोनही ताब्यात घेतले आहे. अहल्यादेवी स्मारकाचे लोकार्पण झाले असल्याचा दावा पडळकर यांनी केला असून जोपर्यंत ताब्यात घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची मुक्तता केली जात नाही, तोपर्यंत आपण मागे हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या:

भाजपच्या असंख्य भ्रष्टाचारांबाबत हाच हातोडा शांत का?- संजय राऊत

“…तेव्हा महाराष्ट्र चुलीत गेलेला चालतो काय?”, राऊतांचा फडणवीसांना सवाल

“…तरी त्यांचा मेंदू ठिकाणावर येणार नाही”,संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना जोरदार टोला

“..करणाऱ्याला पेशवे शेणात पडलेल्या शेंगदाण्यासारखे काढून फेकतील”, अमोल मिटकरींनी ‘मंगळसूत्र चोर’ म्हणत कुणावर साधला निशाणा?

“…हा महाराष्ट्रद्वेष म्हणजेच तुमचा गुड गव्हर्नन्स मानायचा का?”, संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!