Share

IPL 2022: आयपीएल सुरु होण्याआधी धोनी कोहलीची भेट; दोघांना सोबत बघून चाहते भावुक!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएलच्या १५ व्या आवृत्तीला शनिवारी रवींद्र जडेजाच्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ची मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) सोबत भिडायचे आहे. स्पर्धेच्या दोन दिवसांआधीच धोनीने चेन्नईचे कर्णधारपद सोडत असल्याचे सांगितले. यानंतर त्याला सगळीकडून शुभेच्छा मिळत होत्या. मात्र यात एक विशेष शुभेच्छा विराट कोहली याची होती. त्याने भावनिक पोस्ट लिहत धोनीला शुभेच्छा दिल्या होत्या.

धोनीला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्यानंतर कोहलीची (virat kohli) शुक्रवारी संध्याकाळी प्रॅक्टिस करताना त्याच्या आवडत्या माही भाईची (MS Dhoni) भेट झाली. यावेळी विराटने धोनीला कडाडून मिठी मारली आणि काही मिनिटे तो त्याला सोडतही नव्हता. त्यांच्या या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच या दोघांना बऱ्याच दिवसांनंतर सोबत पाहून चाहतेही भारावलेले दिसले. यावेळी धोनी आणि कोहली जे आता कर्णधार नाहीत ते आपल्या संघाकडे निरखून पाहतानाही दिसले.

https://twitter.com/CSKFansArmy/status/1507418596536098817?s=20&t=VTnxWkMsYq2V-2iQk30wCw
https://twitter.com/RCBTweets/status/1507376585686798337?s=20&t=tZEpkdnuLrh0-q_BTLi9Kw

चेन्नईचा जुना खेळाडू आणि सध्याचा आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस ही त्याच्या जुन्या सहकाऱ्यांना भेटला. CSK आणि KKR यांच्यातील सुरुवातीची लढत मागील वर्षीच्या फायनलची रीमॅच असेल, जिथे तत्कालीन कर्णधार धोनीने सुपर किंग्जचे नेतृत्व करून चौथ्या आयपीएल विजेतेपदावर नाव कोरले होते.
दरम्यान, आरसीबी २८ मार्च रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!