🕒 1 min read
मुंबई : कपिल शर्मा आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमी आपली मतं मांडताना दिसतो. त्यामुळे अनेकदा तो ट्रोलही होतो. यावेळी त्याने मोदींची प्रशंसा करणारं एक ट्वीट केलं आहे, जे व्हायरल झालं आहे. पण यावरन नेटकऱ्यांनी मात्र त्याला ट्रोल केलं आहे
ट्वीटमध्ये कपिलने नेमकं काय म्हंटले?
कपिलनं लिहिलंय,”पंतप्रधान नरेंद्र मोदीजी,भारताच्या अमूल्य खजिन्याला थेट ऑस्ट्रेलियातून पुन्हा आपल्या देशात आणण्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद. २९ पुरातन वस्तू आपण ऑस्ट्रेलियातून भारतात परत आणल्या आहेत. या वस्तु ६ वेगवेगळ्या श्रेण्यांमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत-शिव आणि त्यांचे शिष्य,शक्तीची पूजा,भगवान विष्णू आणि त्यांची रुपं,जैन परंपरा,चित्र आणि सजावटीच्या वस्तू” या ट्वीट सोबत नरेंद्र मोदी त्या अमूल्य खजिन्यासमोर उभे राहून त्यांना न्याहाळत असल्याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.
भारत देश के अनमोल ख़ज़ाने की अमूल्य निधि के फिर से स्वदेश लौटने की बहुत बहुत बधाई , अनेक शुभकामनाएँ.. आभार.. आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी ???? जय भारत.. हर हर महादेव ???? https://t.co/mdlRhX0aDD
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) March 22, 2022
या कपिलच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या खूप संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. काही लोकांनी कपिलच्या पोस्टचं कौतूक केलं आहे. तर काहींनी चक्क म्हटलंय,’पेड ट्वीट’. तर आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,’एकदा भेट तू नक्की. हा तोच आहे ज्यानं ‘द काश्मिर फाईल्स’ सिनेमाचं प्रमोशन करायला नकार दिला होता,आणि आता उगाचच सौजन्याचं नाटक करतोय.सगळं लक्षात ठेवणार आम्ही, पहातो एकदा तुला”.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
