Share

IPL 2022 : चेन्नईचा पुढचा कॅप्टन कोण?, सुरेश रैनानं घेतलं ‘या’ खेळाडूचं नाव!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ सुरू होण्यास आता केवळ मोजकेच दिवस उरले आहेत. २६ मार्चला पहिला सामना गतविजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे. यावेळीही चेन्नईची कमान महेंद्रसिंह धोनीच्या हाती असेल. गेल्या वेळी त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने चौथ्यांदा विजेतेपद पटकावले होते. धोनी ४० वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत आता त्यांच्यानंतर सीएसकेची कमान कोण सांभाळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या शर्यतीत अनेक खेळाडू आहेत, पण मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरेश रैनाने धोनीच्या उत्तराधिकाऱ्याचे नाव सांगितले आहे.

आयपीएल २०२२च्या ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सुरेश रैना म्हणाला, “चेन्नईमध्ये रवींद्र जडेजा, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा आणि ड्वेन ब्राव्हो सारखे खेळाडू आहेत. हे सर्व खेळाडू सक्षम आहेत आणि त्यांना खेळाची चांगली जाण आहे. पण मला विश्वास आहे की या शर्यतीत जडेजा आघाडीवर आहे. या मोसमापूर्वी रैनाला चेन्नईने सोडले होते. तो लिलावात उतरला होता. पण त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. अशा स्थितीत तो या मोसमात खेळताना दिसणार नाही.”

जडेजा धोनीचा उत्तराधिकारी बनण्याची आशाही जास्त आहे. कारण आयपीएल २०२२च्या लिलावापूर्वी, चेन्नई सुपर किंग्जने या हंगामासाठी राखून ठेवलेल्या चार खेळाडूंमध्ये जडेजा पहिल्या क्रमांकावर होता. चेन्नईने १६ कोटी रुपये देऊन जडेजाला रिटेन केले. तर धोनी दुसऱ्या क्रमांकावर होता आणि त्याला १२ कोटी मिळाले. वास्तविक, धोनीने स्वत: जडेजासाठी टॉप रिटेन्शन स्लॉट सोडला होता. तेव्हापासून धोनी जडेजाला भावी कर्णधार म्हणून तयार करत असल्याची अटकळ बांधली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!