🕒 1 min read
मुंबई : श्रुती हासन आणि शांतनु हझारिका यांनी आपल्या नात्याचा खुलासा करताना म्हटलं आहे की,”त्याचं लग्न झालं आहे,पण कसं?” खरं तर हे जाणून घेण्यासारखं आहे. श्रुती हासन नेहमीच सोशल मीडियावर बॉयफ्रेंड शांतनु हझारिकासोबतचे फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करीत असते.
2020 पासून हे दोघे नात्यात आहेत. म्हणजे कोविडच्या कठीण प्रसंगात एकमेकांची साथ लाभल्यानं हे दोघे एकमेकांच्या अधिक जवळ आल्याचं मागे त्यांनी म्हटलं होतं. तेव्हापासनं आतापर्यंत त्यांचं नातं बहरतानाच सगळ्यांनी पाहिलं आहे. एका मुलाखतीत शांतनुला विचारलं गेलं होतं,’श्रुती सोबतचं हे नातं पुढे नेण्यासाठी तो लग्नाचा विचार करीत आहे का?” त्यावर त्यानं उत्तर देताना जो खुलासा केला आहे तो सगळ्यांना चकीत करुन सोडणारा आहे.
तो म्हणाला,”आम्ही मनातून केव्हाच लग्न केलं आहे. मनानं आम्ही एकमेकांचा पती-पत्नी म्हणून स्विकार केला आहे. आणि त्यामुळेच आमचं नातं अधिक घट्ट झालेलं पहायला मिळत आहे. आमच्यासाठी हे नातं अधिक स्पेशल त्यामुळेच बनू शकलं. हो पण रीतीपरंपरेनुसार जसं लग्न करतात ते कधी होईल मला माहित नाही. गोष्टी व्यवस्थित जुळून आल्या तर बघू पुढे होईलच आमचं लग्न”. शांतनुनं श्रुतीसोबतच्या आपल्या नात्याचा खुलासा करताना स्पष्ट केलं की,”आम्ही एकमेकांना प्रेरणा देतो,प्रोत्साहन देतो जे खरंतर आमच्या नात्यातलं बलंस्थान आहे. आम्हाला एकमेकांच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींनी प्रेरणा दिली आहे. मी लकी आहे की मला श्रुती सारखी पार्टनर मिळाली. क्रिएटिव्हिटीच्या बाबतीत आमच्यात खुप साम्य आहे. दरदिवशी नवं काहीतरी सुचणं, नव्या विचाराचा ध्यास असणं आणि एक नवं उद्दिष्टय समोर ठेवणं हे जर तुमच्यासारखंच तुमच्या पार्टनरच्या बाबतीतही घडत असेल तर यापेक्षा आनंद तो काय असावा”.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
