Share

IPL 2022 : काय सांगता..! विराट पुन्हा होणार RCBचा कॅप्टन? वाचा कोणी दिलंय हे मत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएलटच्या १५व्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी फक्त तीन दिवस उरले आहेत. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. यंदाच्या मेगा लिलावामुळे बहुतांश संघांमध्ये बरेच बदल झाले आहेत. पण सीएसकेने लिलावात त्यांचे बहुतांश जुने खेळाडू विकत घेतले. फाफ डू प्लेसिसला खरेदी करण्यात संघ अपयशी ठरला.

आयपीएल २०२२च्या लिलावात आरसीबीने फाफ डू प्लेसिसला ७ कोटी रुपयांना विकत घेतले. यानंतर फ्रेंचायझीने त्याला १५व्या हंगामासाठी संघाचा कर्णधार म्हणूनही नियुक्त केले. आयपीएल २०२२मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पहिला सामना पंजाब किंग्ज विरुद्ध २७ मार्च रोजी खेळणार आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू आर अश्विनने फाफ डू प्लेसिस आणि आरसीबीबद्दल आपले मत मांडले आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा अश्विन म्हणाला, “डुप्लेसिसची आयपीएल कारकीर्द शेवटाकडे आली आहे, तो आणखी दोन किंवा तीन वर्षे खेळू शकतो, आरसीबीने त्याला कर्णधार बनवले आहे, हा त्याचा चांगला निर्णय आहे.”
अश्विन पुढे म्हणाला, ”मला वाटते की, विराट कोहली कर्णधार म्हणून गेल्या काही वर्षांत खूप तणावातून गेला आहे, त्यामुळे हे वर्ष त्याच्यासाठी ब्रेकसारखे असेल, पुढचा हंगाम बंगळुरू त्याला कर्णधार म्हणून नियुक्त करू शकते.”

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!