नांदेड: शिवसेना सचिव आणि राज्यसभा खासदार अनिल देसाई हे शिवसंपर्क अभियानासाठी नांदेड दौऱ्यावरती आले आहेत. काल झालेल्या ईडी कारवाई संदर्भात त्यांची प्रतिक्रिया घेतली असता देसाई म्हणाले की भारतीय जनता पार्टी सुडाचे राजकारण करत आहे. तसेच शासकीय तपास यंत्रणेचा राजकीय सूडापोटी वापर करणे, हे कितपत योग्य आहे? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाई संदर्भात पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे हे अत्यंत चुकीचे आहे. या गोष्टीकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. शासकीय यंत्रणेचा वापर करून दडपशाही करण्याचा प्रकार केंद्र सरकार मधील यंत्रणा करत आहे”.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

