Share

IPL 2022 : चाहत्यांसाठी खुशखबर..! यंदाच्या हंगामात सुरेश रैनाची होणार एन्ट्री; वाचा सविस्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात ६०० खेळाडूंवर बोली लावण्यात आली होती. या यादीत मिस्टर आयपीएल सुरेश रैनाचेही नाव होते. या लिलावात एकूण २०४ खेळाडूंची विक्री झाली, उर्वरित खेळाडूंना यावेळी खरेदीदार मिळालेला नाही. सुरेश रैना देखील अशा खेळाडूंपैकी एक होता, ज्याला कोणीही खरेदीदार सापडला नाही, चाहत्यांनी रैना अनसोल्ड राहिल्यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. पण रैनाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रैना पुन्हा एकदा या लीगमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे.

सुरेश रैना नव्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या बॅटने भरघोस धावा करणारा रैना आता आयपीएलमध्ये कॉमेंट्री करताना दिसणार आहे. टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीही रैनाला पाठिंबा देताना दिसणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तो हिंदीत कॉमेंट्री करणार आहे.

सुरेश रैना २०२०च्या आयपीएलमध्येही खेळला नव्हता. २०२१मध्ये रैनाने पुनरागमन केले आणि तो पुन्हा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसला. यावेळी चेन्नईने रैनाला कायम ठेवले नाही आणि मेगा लिलावात रैनाला एकही खरेदीदार मिळाला नाही, त्यामुळे तो आता कॉमेंट्रीमध्ये नशीब आजमावताना दिसणार आहे.

आयपीएल २०२२साठी हिंदी समालोचकांची यादी –

आकाश चोप्रा, इरफान पठाण, गौतम गंभीर, पार्थिव पटेल, निखिल चोप्रा, तान्या पुरोहित, किरण मोरे, जतीन सप्रू, सुरेन सुंदरम, रवी शास्त्री, सुरेश रैना.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!