Share

IPL 2022 : ना रोहित, ना विराट, ना धोनी..! श्रेयस अय्यरचा आवडता कॅप्टन ठाऊक आहे का?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय फलंदाज आणि कोलकाता नाइट रायडर्सचा नवा कर्णधार श्रेयस अय्यरने त्याचा भारतीय संघातील मित्र केएल राहुलचे कौतुक केले आहे. शांत स्वभाव आणि मैदानावर विश्वासार्ह निर्णय घेण्याची क्षमता यामुळे राहुल माझा आवडता कर्णधार बनला, असे श्रेयसने सांगितले.

अय्यर या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेत राहुलच्या नेतृत्वाखाली खेळला होता. अय्यरने राहुलच्या नेतृत्वाचे कौतुक केले. तो म्हणाला, “राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणे खूप छान होते. प्रथम, तो एक महान खेळाडू आहे. त्याचा मैदानावरील आत्मविश्वास आणि त्याने संघाच्या बैठकीत खेळाडूंना दिलेला पाठिंबा आश्चर्यकारक आहे.”

तो पुढे म्हणाला, ”राहुल अतिशय शांत स्वभावाचा आहे आणि मैदानात तो आकलनाच्या आधारे निर्णय घेतो. त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याचा मला आनंद झाला.” दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुलने श्रेयस अय्यरच्या हातात चेंडू दिला. अय्यरने तीन षटकांत २१ धावा दिल्या.

अय्यर म्हणाला, ”त्याने मला गोलंदाजीसाठी तीन षटके दिली, असे यापूर्वी कोणत्याही कर्णधाराने केले नव्हते. हो, तो माझा आवडता कर्णधार आहे.” राहुलने गेल्या वर्षी पंजाब किंग्जचे नेतृत्व केले होते आणि आयपीएल २०२२मध्ये तो लखनऊ सुपरजायंट्सची कमान सांभाळेल.

महत्त्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!