🕒 1 min read
मुंबई: दिल्लीचे असूनही ३६ आकडा असलेले दोन दिल्लीकर म्हणजेच विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद सर्वाना माहिती आहे. आयपीएलमध्ये मैदानावर त्याच्यात झालेले भांडण आजही क्रिकेट रसिक विसरू शकले नाही. गौतम गंभीर आता क्रिकेट मधून निवृत्त झाला आहे. तसेच त्याचे विचारही आता वैर असलेल्या खेळाडूंबाबत बदललेले दिसत आहे. गंभीर नुकतेच विराट आणि धोनीचे तोंड भरून कौतुक केले आहे.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (virat kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके ठोकू शकतो, असेही गौतम गंभीरने (gautam gambhir) नमूद केले. त्याचवेळी त्याने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध विराटला त्याचा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार का दिला हेही सांगितले. यावर बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “तु १०० शतके झळकावू शकतो माझ्या मते तो करेल कारण त्याच्यात ती क्षमता आहे. पण, त्याच पहिलं शतक त्याला नेहमी लक्षात राहील. बांगलादेशातील पहिले आंतरराष्ट्रीय शतक आणि श्रीलंकेविरुद्धचे पहिले एकदिवसीय शतक मला अजूनही आठवते. त्यामुळे मला त्याचे शतक खास बनवायचे होते. विराट कोहलीने आतापर्यंत जे काही साध्य केले आहे त्याचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही आणि तो यापुढेही तितकीच चांगली कामगिरी करत राहील.”
गंभीरने याच मुलाखतीत धोनीचेही कौतुक केले होते. जिथे त्याने जर गरज पडली तर सर्वात आधी मी त्याच्यासोबत उभा राहील असे सांगितले. आता त्याने विराट कोहलीचीही प्रशंसा केली आहे. आपल्या कारकिर्दीत बऱ्याच खेळाडूवर टीका शस्त्र उठवणाऱ्या गंभीरचे चांगले वक्तव्य ऐकून क्रिकेट रसिकही हैराण झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- धर्मेंद्र यांनी दाखवली ६२ वर्षांपूर्वीच्या व्हिंटेज कारची झलक, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…
- Women’s WC 2022 : मितालीचा अजूनही क्रिकेटवर ‘राज’ ; ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात रचले रेकॉर्ड!
- “शरद पवार पावसात भिजले अन् निमोनिया…”, राष्ट्रवादीचा टोला
- भगवंत मान यांच्या नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पडला पार!
- “सत्तेच्या खुर्चीसाठी किती तिलांजली”, मविआ सरकारवर केशव उपाध्येंचा हल्लाबोल

