🕒 1 min read
मुंबई : आयपीएल सुरू होण्यासाठी फक्त आठवडा बाकी आहे.मात्र त्याआधी लखनऊ सुपरजायंट्सला मोठा धक्का बसला आहे. नवीन फ्रँचायझीचा हा पदार्पणाचा हंगाम आहे आणि यासाठी संघाने ऑक्शनमध्ये अनेक सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश केला होता. मात्र स्पर्धेआधीच या वेगवान गोलंदाजांचे बाहेर होणे त्यांच्यासाठी अडचण निर्माण करणारी ठरली आहे.
लखनऊ संघातून बाहेर पडलेल्या खेळाडूचे नाव मार्क वुड (mark wood) आहे. वुडला लखनऊ संघाने ७.५ कोटीत खरेदी केले होते. वास्तविक इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड त्याच्या फ्रेंचायझीमध्ये सामील होऊ शकणार नाही. कारण गेल्या आठवड्यात नॉर्थ साऊंडमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात त्याला दुखापतीचा सामना करावा लागला होता. यादरम्यान त्याच्या कोपराला दुखापत झाली आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने वुडची स्थिती लखनऊ सुपरजायंट्स फ्रँचायझीला सांगितली होती. यादरम्यान तो गोलंदाजी करू शकत नाही हे निश्चित झाले. कोणत्याही जोखमीमुळे त्यांची दुखापत अधिक खोलवर जाईल आणि त्यांना आगामी काळात नुकसान सहन करावे लागेल, असे त्यांनी सांगितले. मार्कच्या जागी आता लखनऊ कोणाला रिप्लेसमेंट म्हणून घेईल याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022: हैद्राबादच्या संघात जोडला गेला ‘हा’ धडाकेबाज गोलंदाज; फलंदाजांना धोक्याची घंटा!
- करुणा शर्मा उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
- “२०२४ ला धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा ही निवडणूक शंभर टक्के होणार”
- IPL 2022: के एल राहुलच्या कमी स्ट्राईकरेट बाबत कुंबळेचे वक्तव्य; म्हणाला “आम्ही कोणाला…”
- होळीचे औचित्य साधत राऊतांनी साधला भाजपवर निशाणा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
