🕒 1 min read
मुंबई : आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबादची बॉलिंग लाइन अप खूप मजबूत दिसत आहे, फ्रँचायझीकडे नेहमीच स्टार गोलंदाजांचा मारा असतो. यंदाही या संघात भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, उमरान मलिक, मार्को यान्सनसारखे वेगवान गोलंदाज आहेत. आता या गोलंदाजांना प्रशिक्षण देण्यासाठी हैदराबाद संघाने एका विदेशी वेगवान गोलंदाजाला आपला भाग बनवले आहे.
हैद्राबादशी जुळला गेलेला विदेशी गोलंदाज डेल स्टेन (dale steyn) आहेत. सनरायझर्स हैदराबाद कोचिंग स्टाफ आयपीएलमधील सर्वोत्तम कोचिंग स्टाफपैकी एक आहे. कारण यावेळी त्याचे मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी (tom moody) आहेत. ब्रायन लाराकडे (brian lara) फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मुथय्या मुरलीधरन फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार असून आता या यादीत वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून डेल स्टेनचे नावही जोडले गेले आहे.
The Steyn-Gun is here and ready to fire. ???????? @DaleSteyn62 #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/cAl5OgGrIA
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 17, 2022
हैद्राबाद संघाने ट्विट करून डेल स्टेनच्या आगमनाची माहिती दिली आहे. यासोबतच डेल स्टेन आनंद व्यक्त करत म्हणाला, “मी परत आल्याने खूप आनंद झाला आहे. मी बराच काळ भारतात आहे आणि म्हणून मी परत येण्यासाठी खूप उत्सुक आहे. विमानतळावरून इथे येताना अनेक आठवणी जाग्या झाल्या.” सनरायझर्स हैद्राबाद आयपीएलमध्ये पहिला सामना २९ मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- “२०२४ ला धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा ही निवडणूक शंभर टक्के होणार”
- IPL 2022: के एल राहुलच्या कमी स्ट्राईकरेट बाबत कुंबळेचे वक्तव्य; म्हणाला “आम्ही कोणाला…”
- होळीचे औचित्य साधत राऊतांनी साधला भाजपवर निशाणा!
- IPL 2022:शार्दूल ठाकूरची स्पर्धेआधी मजेशीर पोस्ट; रितिका शर्माने केले ट्रोल
- ‘द कश्मीर फाइल्स’वरुन होणाऱ्या वादावर नागराज मंजुळे म्हणाले; चित्रपटगृहाबाहेर अशी हाणामारी…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
