🕒 1 min read
बीड : धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांनंतर चर्चेत आलेल्या शिवशक्ती पक्षाच्या करुणा शर्मा (Karuna Sharma) आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. दरम्यान, आगामी कोल्हापूर पोटनिवडणुकीत त्या शिवशक्ती सेनेच्या अधिकृत उमेदवार असणार आहेत.
करुणा शर्मा यांनीच शिवशक्ती सेना हा पक्ष स्थापन केला असून मागील काही दिवस पक्षातर्फे कोण उमेदवार असेल यावर विचार विनिमय झाले आणि तद्पश्चात करुणा शर्मा यांनी स्वतःच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. पक्ष स्थापनेनंतर लगेच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उतरल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळत आहे.
दरम्यान, यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना करुणा शर्मा म्हणाल्या की,‘काँग्रेसला जर बिनविरोध निवडणूक करायची असेल तर त्यांनी मला पाठिंबा द्यावा. माझ्यावर जेव्हा अन्याय झाला तेव्हा कोणी आवाज उठवला नाही. आता पुन्हा एकदा संधी आहे, लोकांनी मला साथ द्यावी.’
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022: के एल राहुलच्या कमी स्ट्राईकरेट बाबत कुंबळेचे वक्तव्य; म्हणाला “आम्ही कोणाला…”
- “भाजपला कोणीही घाबरत नाही”, संजय राऊतांचे टीकास्त्र
- रत्नागिरीत दोन पालख्या भेटीचा नयनरम्य सोहळा!
- IPL 2022: बायो बबलमध्ये खेळाडूंचे होळी सेलिब्रेशन, आवेश आणि व्यंकटेश अय्यर थिरकले
- “२०२४ ला धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा ही निवडणूक शंभर टक्के होणार”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
