🕒 1 min read
बीड : शिवशक्ती पक्षाच्या करुणा शर्मा (Karuna Sharma) या सध्या कोल्हापूर पोटनिवडणूक लढवत आहेत. दरम्यान, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा ही निवडणूक शंभर टक्के होणार, असे करुणा शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे २०२४ ला नवरा विरुद्ध बायको निवडणूक चांगलीच गाजणार असल्याने आत्तापासूनच याविषयी चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळत आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना करुणा शर्मा म्हणाल्या की,‘काँग्रेसला जर बिनविरोध निवडणूक करायची असेल तर त्यांनी मला पाठिंबा द्यावा. माझ्यावर जेव्हा अन्याय झाला तेव्हा कोणी आवाज उठवला नाही. आता पुन्हा एकदा संधी आहे, लोकांनी मला साथ द्यावी’, असे करुणा म्हणाल्या.
दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की,‘२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा ही निवडणूक शंभर टक्के होणार.’ तसेच आता कोल्हापुरातून निवडून आले तरीसुद्धा मी बीडमध्ये निवडणूक लढवणारच, असेही करुणा शर्मा यावेळी म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022: के एल राहुलच्या कमी स्ट्राईकरेट बाबत कुंबळेचे वक्तव्य; म्हणाला “आम्ही कोणाला…”
- “भाजपला कोणीही घाबरत नाही”, संजय राऊतांचे टीकास्त्र
- रत्नागिरीत दोन पालख्या भेटीचा नयनरम्य सोहळा!
- IPL 2022: बायो बबलमध्ये खेळाडूंचे होळी सेलिब्रेशन, आवेश आणि व्यंकटेश अय्यर थिरकले
- “होळी वर्षातून एकदा येते पण यांचा शिमगा…”, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
