🕒 1 min read
मुंबई : काल(१६ मार्च)अधिवेशनात बोलत असतांना भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी विविध मुद्द्यांवरून पर्यावरण खाते तसेच मुंबई महापालिकेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच यावेळी पाकिस्तानी एजन्ट आणि जागतीक पातळीवरील घोटाळेबाजासोबत बेस्टच्या ई बसचा व्यवहार असल्याचा खळबळजनक दावाही शेलार यांनी केला आहे.
यावेळी बोलत असतांना आशिष शेलार म्हणाले की,‘कॉसिस ई-मोबिलीटी या कंपनीकडून बेस्टसाठी 1400 बसेस घेतल्या जाणार आहेत. आणि त्याचा मोबदला म्हणून २८०० कोटी रुपये दिले जाणार आहे. परंतु मुंबईच्या रस्त्यावर चाचणी न करताच या बसेसचं कंत्राट कसं दिलं?’, असेही शेलार म्हणाले.
पाकिस्तानी एजन्ट आणि जागतीक पातळीवरील घोटाळेबाजासोबत बेस्टच्या ई बसचा व्यवहार. (1/5)@BJP4Maharashtra @BJP4Mumbai#Day10#MVA#BudgetSession2022#maharashtra_budget2022#MaharashtraAssembly pic.twitter.com/183b6jvJbl
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 16, 2022
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘या कंपनीत मुख्य गुंतवणूकदार असलेल्या शौकत अली अब्दुल गफूर हा लिबियामधील पाकिस्तानी एजंट असून इंडियन स्टेट फॉरेस्ट तर्फे जाहीर करण्यात आलेल्या अहवालामध्ये महाराष्ट्रात जंगल वाढले, असे जाहीर करण्यात आले असले तरी १ हजार ८८२ चौ. किमीचे जंगल गायब झाल्याचेही नमूद करण्यात आले.’ तसेच हे जंगल १ हजार कोटींचे असल्याचा दावाही शेलार यांनी केला.
महत्वाच्या बातम्या:
- “२०२४ ला महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचं…”, देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
- “केंद्रीय तपास यंत्रणा पिंजऱ्यातल्या पोपटाप्रमाणे काम…” ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
- “लोकांचे प्राण धोक्यात घालून राजकारण करण्याची मानसिकता”- संजय राऊत
- रंगाची उधळण करताना केसांची ‘अशी’ काळजी घ्या !
- IPL 2022: ‘घरी नंबर १ कोण?’ चाहत्याच्या प्रश्नाला धोनीचे मजेशीर उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
