मुंबई : रंगपचमीचा सण म्हणजे विविध रंगाची उधळण करणारा सण. रंगपंचमी हा सण फक्त एका दिवसावर सण येऊन ठेपलाय. या सणाच्या तयारीला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. सण साजरा तर करायचा आहे, परंतु विविध रंगाने केसांवर परिणाम होतो त्याचे काय? अशावेळी केसांची काळजी कशी घ्यावी? हा प्रश्न कित्येकजणांना पडतो, तर या विषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया..
केसांची अशी काळजी घ्या –
रंग खेळण्याआधी केसांची काळजी न घेतल्यास त्याचे परिणाम नंतर भोगावे लागतात. रंग खेळण्याआधी केसांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे, नाहीतर केसांचा पोत बिघडतो. रंग खेळताना केस मोकळे सोडू नका. केस मोकळे सोडल्यास रंग केसांच्या मुळांपर्यंत जातो. ज्यामुळे केसांचे अधिक नुकसान होऊ शकते.
रंग खेळण्याआधी केसांना तेलाने मालिश करा –
रंग खेळण्याआधी 15 मिनिटे केसांना तेलाने मालिश करा. नारळ, ऑलिव्ह ऑईल, राईचे तेल अथवा इतर कोणत्याही तेलाने केसांना मालिश करा. तेल लावल्याने रंग केसांना इजा पोहोचवणार नाही. सुके रंग खेळल्यास केसांमधून कंगव्याने रंग हटवा. त्यानंतर पाण्याने केस धुवा. जर तुम्ही ओले रंग वापरले असतील तर साध्या पाण्याने केस धुवून घ्या त्यानंतर शॅम्पूने केस धुवा. रंग खेळल्यानंतर कधीही गरम पाण्याने केस धुवू नका. गरम पाण्याने केस धुतल्यास तुमच्या केसांना नुकसान पोहोचते. व केस कमकुवत होतात.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

