Share

देशात पुन्हा कोरोनाची धास्ती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक

Published On: 

नवी दिल्ली : दक्षिणपूर्व आशिया आणि युरोपीय देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया (Dr Mansukh Mandaviya) यांनी बुधवारी (१६ मार्च) उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांडविया यांनी अलर्ट जारी केला असून सर्वच स्थरावर कोरोना नियमांचे काटेकोर पालन होईल यासंदर्भात आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या बैठकीत दक्षता, आक्रमक जीनोम सिक्वेन्सिंग आणि परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून कोविड-19 लसीकरण कार्यक्रम आणि २७ मार्चपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे पुन्हा सुरू करण्यासंदर्भातही मांडविया यांनी आढावा घेतला. चीन, सिंगापूर, हाँगकाँग, व्हिएतनाम आणि काही युरोपीय देशांमध्ये कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ असल्याने केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ही बैठक घेतली.

दरम्यान, या बैठकीला नीती आयोगाचे डॉ. व्हीके पॉल, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया आणि आरोग्य सचिव उपस्थित होते. तसेच भारतामध्ये काल कोरोनाच्या २,८७६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून देशातील एकूण सक्रीय कोरोना रुग्ण ३२,८११ आहेत. अद्याप भारतामधील कोरोनाची साथ अटोक्यात असली तर भविष्यात ती वाढू नये या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!