🕒 1 min read
मुंबई: सुरेश रैना ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखला जातो.मात्र गेल्या महिन्यात चेन्नई सुपर किंग्स किंवा इतर ९ संघांपैकी कोणत्याही संघाने त्याला आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनमध्ये खरेदी केले नाही. त्याच्या चाहत्यांसाठी धक्कादायक होते. सोशल मीडियावर रैना गुजरात टायटन्समध्ये जेसन रॉयची जागा घेऊ शकेल अशी चर्चा झाली मात्र तिथेही रैनाला संधी मिळाली नाही. मात्र आता रैना आयपीएलमध्ये एका नव्या रूपात येणार असल्याची नवीन चर्चा सूर झाली आहे.
सुरेश रैना (suresh raina) आणि भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (ravi shastri) आयपीएलमध्ये कॉमेंट्री करणार असल्याचे समोर आले आहे. “तुम्हा सर्वांना माहित आहे की रैना यावेळी आयपीएलचा भाग असणार नाही, पण आम्हाला कसे तरी त्याला स्पर्धेशी जोडायचे होते. त्याचे खूप चाहते आहेत आणि त्याला मिस्टर आयपीएल म्हणून ओळखले जाते हे देखील ए क कारण आहे. शास्त्रीबद्दल सांगायचे तर, तो स्टार स्पोर्ट्स इंग्लिश कॉमेंट्री टीमचा भाग होता. पण २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर त्याने भाष्य केले नाही कारण तो भारताचा मुख्य प्रशिक्षक बनला होता, ”आयपीएलच्या एका सूत्राने प्रसिद्ध वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे.
चेन्नईचा ‘चिन्ना थाला’ यावर्षी कोणत्याही संघाचा भाग असणार नाही. रैना आयपीएलच्या इतिहासातील चौथा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे आणि त्याने २०५ सामन्यांमध्ये ५५२८ धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे आणि त्या कालावधीत त्याने २५ विकेट्स देखील काढल्या आहेत. रैनाची कमेंटेटरच्या रूपात बघण्यासाठी त्याचे छते उत्सुक दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- जळगावात विद्यार्थिनीने दिला रोड रोमिओला चोप; व्हिडिओ व्हायरल
- कवी कुमार विश्वासची ‘काश्मीर फाइल्स’वर जळजळीत प्रतिक्रिया
- रत्नागिरीत गावच्या वेशीबाहेर जाऊन होळी तोडण्याची प्रथा आजही कायम!
- ‘प्रवीण दरेकर गेली २५ वर्ष बँकेच्या सभासदांची फसवणूक करत आहेत’ – धनंजय शिंदे
- ‘आरोप करणे हा विरोधकांचा एककलमी कार्यक्रम’ – रुपाली चाकणकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
