🕒 1 min read
मुंबई: पोलिसांच्या बदल्यांचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचा जबाब नोंदवून घेतला. यावरच आज (१४ मार्च) फडणवीस यांनी संसदेत थेट काँग्रेसवर निशाणा साधला. “मी कोणत्या घरातून येतो हे माहीत आहे का? असा सवाल करत इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना दोन वर्ष तुरुंगात ठेवलं. त्यांनी कोणताही गुन्हा केला नव्हता. माझ्या काकूंना १८ महिने तुरुंगात ठेवले. त्यांनीही कोणता गुन्हा केला नव्हता. आम्ही जेलला घाबरणारे नाही. ज्यांनी प्रश्नावली बदलली त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे अशा प्रकारच्या मुद्द्यावर आम्ही लढतच राहणार. जी काही कायदेशीर लढाई असेल ती लढू.”, असे सणसणीत उत्तर यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
दरम्यान भाजप आमदार आशिष शेलार यांनी यासंदर्भात एक स्थगन प्रस्ताव आज विधानसभेत मांडला. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर देताना फडणवीसांना या प्रकरणात गोवण्याचा कोणताही हेतू नसल्याचं स्पष्ट केलं. तर देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नावली बदलण्यात आल्याने संताप व्यक्त केला. तसेच मला प्रश्नावली पाठवण्यात आली होती. त्यावर मी लेखी उत्तर देऊन सांगितलं होतं की मला उत्तर द्यायचं आहे. मला प्रिव्हलेज घ्यायचं नव्हतं हेही मी स्पष्ट केलं होतं. मला जी प्रश्नावली पाठवण्यात आली होती त्यातील प्रश्न साक्षीदाराचे होते. कालचे प्रश्न आरोपीसाठीचे होते. तुम्ही ऑफिशियल सिक्रेसीचा भंग केला का? असा प्रश्न मला विचारण्यात आला. असं साक्षीदाराला विचारतात का? जाणीवपूर्वक प्रश्नावली बदलून या व्यक्तीला गुंतवता येतं का हेही यातून दिसत होतं. असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
यावेळी त्यांनी मी वकील आहे. मला समजतं. एक नागरिक म्हणून व्हिसल ब्लोअर अॅक्टप्रमाणे मी प्रोटेक्टेड आहे. जे कागदपत्रं माझ्याकडे होते. ते मी कुणाला दिले नाही. केंद्रीय गृहसचिवांना मी ते दस्ताऐवज दिले. पण तुमच्या मंत्र्यानेच ते मीडियाला दिले. असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटासंदर्भात नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले…
-
मुस्कान खानच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाची परवानगी पोलिसांनी नाकारली!
-
‘अजान’ चा आवाज ऐकताच अजित दादांनी थांबवले भाषण; पाहा व्हिडिओ
-
आरसीबीचा कर्णधार असूनही फाफचा चेन्नई मोह सुटेना! धोनीची आठवण काढत म्हणाला…
-
योगी आणि महाराजांची जागा मठात असून राजकारणात नाही; आमदार प्रणिती शिंदेंचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
