🕒 1 min read
दिल्ली: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. भाजपने चार राज्यांत विजय मिळवला आहे. मात्र यावरच संजय राऊत यांनी देशात निवडणुकीपूर्वी अनेक मुद्दे जिवंत केले जातात असे म्हणत भाजपला टोला लगावला आहे.
देशात निवडणुकीपूर्वी अनेक मुद्दे जिवंत केले जातात. जसे हिजाबचा मुद्दा आला. असे अनेक मुद्दे असतात जे अचानक येतात. अलीकडच्या काळात विकासापेक्षा धार्मिक मुद्द्यांवर अधिक भर दिला जातो. आणि त्याच्यावरच राजकारण केले जाते. अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
तसेच यावेळी त्यांनी मोदींवरही निशाणा साधला आहे. मोदी हे फक्त आमचे नेते आहेत. ते फक्त आमचे पंतप्रधान आहेत, असे चित्र भाजपनेच निर्माण केले. मात्र पंतप्रधान देशाचे नेतृत्व करतात. दुर्दैवाने पंतप्रधानांची भाषणे पहिली तर त्यांनीही या चक्रातून बाहेर यायला हवे. आणि स्वतःला बजवायला हवे, की ते देशाचे नेते आहेत.अशी टीका राऊत यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी मुंबईला हिंमत आणि कौशल्याने अंडरवर्ल्डपासून वाचवले – नरेंद्र मोदी
-
“देशाचे पंतप्रधान एका पक्षाचे नसतात, त्यांना खुजं करु नका”, संजय राऊतांचे वक्तव्य
- “बटाटे-टोमॅटोचे दर सांभाळण्यासाठी आपण राजकारणात…”, इम्रान खान संतापले
- योगी आणि महाराजांची जागा मठात असून राजकारणात नाही; आमदार प्रणिती शिंदेंचे वक्तव्य
- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा कोविड पॉझिटिव्ह; नरेंद्र मोदींनी ट्वीट करत म्हटले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
