Share

माझ्याशी लग्न कर, मी तुला २० कोटी रुपये देईन, चाहतीने लग्नाची मागणी घातल्यावर काय म्हणाला कार्तिक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कार्तिक आर्यन हा हिंदी चित्रपट जगतातील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. आर्यनच्या चित्रपटांचे आणि अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. आपल्या चित्रपटांबरोबरच तो सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असतो. आपल्या चित्रपटांबद्दल, आगामी कामाबद्दल तो माहिती देत असतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टची नेहमीच चर्चा पाहायला मिळत असते. सध्या कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओवर एका चाहतीने भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.

https://www.instagram.com/tv/Ca4Fzs6D0Bj/?utm_medium=copy_link

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेता कार्तिक आर्यनने नुकताच बालकलाकार इनायत शर्मासोबत आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये इनायत त्याच्या ‘धमाका’ चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत कार्तिकने “गोड अर्जून पाठक,” असे कॅप्शन दिला आहे. यावर अनेक चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, सगळ्यात जास्त चर्चा एका तरुणीच्या भन्नाट ऑफरची होत आहे

या तरुणीने कार्तिक आर्यनच्या फोटोवर प्रतिक्रिया देताना “माझ्यासोबत लग्न कर,मी तुला २० कोटी रुपये देईन,” अशी थेट ऑफर दिली आहे. यावर कार्तिकनेही प्रतिक्रिया देताना “कधी?” असा प्रश्न या चाहतीला केला आहे. सोबतच त्याने हसण्याचा ईमोजीही शेअर केला आहे. सध्या या जुगलबंदीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. त्याचे चाहते त्याच्या या व्हिडिओला जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!