🕒 1 min read
मुंबई: बोरिवलीत राहणारी रहिवासी या महिलेने आपल्या दत्तक मुलाला आपलीच जात लावण्यात यावी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. ही महिला व्यवसायाने डॉक्टर आहे व हिचे वय ४४ वर्षाची आहे.
यांची याचिका मान्य करत, न्या. एस. बी. शुक्रे व न्या. जी. ए. सानप यांच्या खंडपीठाने वरील निर्देश दिले. संबंधित महिलेतर्फे ॲड. प्रदीप हवनूर यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली. याचिकेनुसार, संबंधित महिलेची जात हिंदू मह्यावंशी म्हणजेच अनुसूचित जाती आहे. आपल्या मुलालाही त्याच जातीचे प्रमाणपत्र देता यावे, यासाठी महिलेने २०१६ मध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. मात्र, ३ सप्टेंबर २०१६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांचा अर्ज फेटाळला गेला.
उपजिल्हाधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळल्यामुळे ही महिला, जिल्हा जात पडताळणी समितीकडे अपिलात गेली. पण समितीनेही त्यांचे अपील फेटाळले होते. त्यामुळे महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने हवनूर यांचा युक्तिवाद मान्य करत दत्तक घेतलेल्या मुलाला अविवाहित आईचीच जात लावून दोन आठवड्यात जात प्रमाणपत्र द्यावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने धारावी विभाग उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
