मुंबई : ‘झुंड’ प्रदर्शित झाल्यापासून अनेकजण बिग बींचे कौतुक करताना दिसत आहेत. बिग बींच्या ट्विटरवर अनेक नेटकऱ्यांनी पोस्ट करत त्यांच्या भूमिकेची स्तुती केली आहे. बिग बींनीही काही निवडक व्यक्तींच्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली आहे. एका चाहत्याने कमेंट करताना म्हटले की, गेल्या ५३ वर्षांत १९६९ मध्ये अमिताभ यांनी चित्रपटात पदार्पण केल्यापासून त्यांच्यात काहीही बदल झालेला नाही. अमिताभ हे सर्व अभिनेत्यांमधील प्रिय अभिनेते आहेत.
https://twitter.com/prashantkawadia/status/1501743976571084804?s=20&t=gLxeOcUJGPqh0urdt77rWQ
यावर अमिताभ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “माझे शरीर मला हे करण्याससाथ देतंय. त्यासोबतच तुमचे प्रेम, आपुलकी यामुळे हे सर्व शक्य आहे.” तर दुसऱ्या एका चाहत्याने ट्विटमध्ये म्हटले की, “८० वर्षांचा एक माणूस उच्च दर्जाचे चित्रपट देत आहेत. जो इतर तरुण कलाकारांपेक्षा फारच चांगला अभिनय करतो आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ‘झुंड’ हा एक स्वच्छ, कौटुंबिक चित्रपट आहे, ज्याद्वारे एक चांगला संदेश मिळतो.”
यावर अमिताभ यांनी फार बोलके उत्तर दिले आहे. अमिताभ बच्चन म्हणाले, “तुम्ही ‘झुंड’ चित्रपटाचे केलेले कौतुक पाहून फार आनंद झाला. पण कृपया कोणत्याही कलाकाराची तुलना करु नका. सर्व कलाकार हे समान आहेत.”
https://twitter.com/prashantkawadia/status/1500658134842765312?s=20&t=fuW0gHn51MqDZ_eXtRhl8w
या चित्रपटात अमिताभ यांच्या भूमिकेचे समीक्षकांकडून कौतुक केले जात आहे. पण याबाबत बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले की, “माझ्यापेक्षा ते तरुण कलाकारच या कौतुकास जास्त पात्र आहेत. या चित्रपटाचा खरोखरच प्रशंसनीय भाग म्हणजे या तरुणांचा अभिनय. हे सर्वजण झोपडपट्टीत राहणारे आहेत. त्यांना त्यांच्या टॅलेंटबद्दल अजिबात कल्पना नव्हती. ते फार नैसर्गिक हावभाव देत होते.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

