Share

“पोपटाचा प्राण महानगरपालिकेत…” चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर घणाघात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  पाचही राज्यांचे निकाल जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपने पुन्हा एकदा यश मिळवले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशभरात भाजपने जल्लोष साजरा करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र भाजपचेही मुंबई कार्यालयाबाहेर जोरदार सेलिब्रेशन चालू आहे. या आनंदात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार यांच्यासह भाजपचे अनेक नेते सहभागी झाले होते. चंद्रकांत पाटील यांनी तर कार्यकर्त्यांसोबत ढोल-ताशाच्या तालात ठेकाही धरला. त्यानंतर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.

‘पोपटाचा प्राण हा मुंबई महानगरपालिकेत’

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, ‘मी आपल्या सर्वांना आगामी महापालिका निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो. ही महानगरपालिका काहीही करुन भाजपच्या ताब्यात आली पाहिजे. पोपटाचा प्राण हा त्या महानगरपालिकेत अडकलेला आहे. आता सगळे वाभाडे निघालेत. आठवडाभरत धाडी चालल्या त्यातून स्पष्ट होईल की विकास किती केला आणि घरी किती पैसे नेले. त्यामुळे आता महापालिका हेच सर्वांचं टार्गेट असलं पाहिजे’, असे म्हणत पाटलांनी शिवसेनेला चक्क आव्हान दिले आहे.

फडणवीसांचे कौतुक

गोव्यातील विजयाबद्दल पाटील यांनी फडणवीसांचे कौतुक केले आहे. “आज आम्हाला मोठा विजय मिळाला त्याचा आम्हाला अभिमान आहे. विशेषतः देवेंद्रजींचे मला अभिनंदन करायचं आहे. बिहारमध्ये ते प्रभारी होते. तिथे भाजप विजयी झाला. आता गोव्यात ते प्रभारी आहेत, तिथेही त्यांनी मोठा विजय मिळवून दिला”. त्यामुळे आगामी निवडणुकांची धुराही फडणवीसांच्या खांद्यावर असणार आहे, यात शंका नाही.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!