🕒 1 min read
नवी दिल्ली : आयसीसी महीला क्रिकेट विश्वचषकाच्या ८ व्या सामन्यात न्यूझीलंडकडून भारतीय संघाला ६२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने ५० षटकात ९ बाद २६० धावसंख्या उभारली होती.
या लक्षाचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ ४६.४ षटकात सर्वबाद १९८ धावांवर गारद झाला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. न्यूझीलंडची सलामी फलंदाज सुजी बेट्स ५ धावा करून बाद झाली. परंतु सोफी डिवाईन आणि एमेलिया केरने चांगली फलंदाजी केली.
या सामन्यात एमी सैटर्थवेट हीने सर्वाधिक ७५ धावा केल्या. तर भारताकडून पूजा वस्त्राकरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर राजेश्वरी गायकवाड ही २ विकेट्स घेतल्या.
भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताला १० धावांवर स्मृती मानधनाच्या स्वरुपात पहिला झटका बसला. भारताकडून हरमनप्रीत कौरने सर्वाधिक ७१ धावांची एकाकी झुंज दिली. परंतु ती संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. तर न्यूझीलंडकडून एमेलिया केर आणि ली ताहुहु यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. एमी सैटर्थवेट हीला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
