🕒 1 min read
नवी दिल्ली : गुजरात टाइटंस संघाचे डायरेक्टर विक्रम सोलंकी यांनी कर्णधार हार्दिक पांड्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की त्याच्याकडे एक चांगला कर्णधार होण्यासाठी सर्व गुण आहेत.
द टेलिग्राफ बरोबर बोलताना सोलंकी म्हणाले की “हार्दिकमध्ये आम्ही एक चांगली क्वालिटी बघितली आहे. ज्यामुळे तो एक सफल कर्णधार बनू शकतो. आम्ही बऱ्याच वेळा त्याचे विक्रम पहिले आहेत. त्याने बऱ्याच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्याने रोहित शर्मा, विराट कोहली आणि एम एस धोनीच्या नेतृत्वात बरेच काही शिकले आहे. त्याला सर्वोत्तम कर्णधार होण्यासाठी या गोष्टींची खूप मदत होणार आहे.”
हार्दिकला आयपीएल २०२२ लिलावत गुजरात टाइटंस संघाने १५ करोड देऊन खरेदी केले आहे. त्यानंतर त्याला संघाचे कर्णधार पदही देण्यात आले आहे. यागोदर तो आयपीएल मधील सर्वात यशश्वी संघ मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. परंतु त्याच्यावर सध्या एक मोठी जबाबदारी असणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
