Share

विकेटकिपरच्या ग्लब्जमध्ये अडकला चेंडू आणि…पहा व्हिडीओ

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : न्यूझीलंडमध्ये सध्या आयसीसी महीला विश्वचषक सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला आणि काचा धमाकेदार आगाज केला. भारतीय संघासोबत अन्य महिला संघ देखील धमाकेदार कामगिरी करत आहेत. प्रत्येक सामन्यातील काही महत्त्वाच्या घटनांचे व्हिडिओ आयसीसीद्वारे सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. असाच एक  व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.

बांगलादेशच्या डावात २६व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर फलंदाजाने यष्टीरक्षकाच्याच्या मागे शॉट मारला आणि धाव घेतली. न्यूझीलंडच्या फिल्डरने चेंडू थ्रो केला आणि यष्टीरक्षकाकडे टाकला. यष्टीरक्षक केटी मार्टिनने चेंडू ग्लव्जमध्ये घेतला आणि विकेटच्या दिशेने टाकला. पण चेंडू तिच्या ग्लव्जमधून विकेटकडे गेलाच नाही. थ्रो आलेला चेंडू मार्टिनच्या ग्लव्जमध्येच अडकला. त्यामुळे तिला बांगलादेशच्या फलंदाजाला धावबाद करता आले नाही. कारण जेव्हा चेंडू मार्टिनच्या ग्लव्जमध्ये आला तेव्हा फलंदाज क्रीझपासून लांब होता. नंतर मार्टिनने ग्लव्जमधून चेंडू कसाबसा बाहेर काढला. या घटनेचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे.

https://www.instagram.com/reel/CayeOR7oMUe/?utm_source=ig_web_copy_link

सोमवारी यजमान न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात सामना झाला. या सामन्यात न्यूझीलंडने ९ विकेट्सने  जबरदस्त विजय मिळवला. न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे हा सामना २७-२७ षटकांचा करण्यात आला होता. बांगलादेशने ८ बाद १४० धावा केल्या. या सोप्या विजयाचे लक्ष्य न्यूझीलंडने फक्त एक विकेट्स गमावून २० षटकात पार केले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!