🕒 1 min read
नवी दिल्ली: गोव्यात सध्या काँग्रेस- भाजप मध्ये चांगलीच लढाई दिसून येत आहे. गोव्यात भाजपचे मोन्सेरात आघाडीवर असून पणजी उमेदवार उत्पल पर्रीकर आता पिछाडीवर आहेत. कलांनुसार भाजप २१ जागांनी आघाडीवर असून काँग्रेस १२ जागांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजप गोव्यात बहुमताच्या वाटचालीकडे दिसून येत आहे. यावरच आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
“उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरेजी आणि आदरणीय संजय राऊत जी (Sanjay Rautj) गोव्यात शिवसेना कुठे आहे?”, असा खोचक सवाल किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत केला आहे.
Uddhav Thackeray SAHEB, Aditya Thackeray ji & Respected Sanjay Raut ji WHERE is Shivsena in GOA !!??
उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे जी आणि आदरणीय संजय राऊत जी गोव्यात शिवसेना कुठे आहे!!?? @BJP4India @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 10, 2022
गोव्यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सभा घेत सेनेचे शक्तीप्रदर्शन केले होते.तसेच खासदार संजय राऊत यांनी मोठे दावे गोवा निवडणुकीबाबत केले होते. मात्र येणाऱ्या निकालानुसार हे दावे फोल ठरल्याचे दिसून येत आहे. यावरूनच भाजपने सेनेला टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
पाच राज्यांच्या निवडणुकां संदर्भातील पहिल्या तासाभरातील १० मुद्दे
-
UP Results 2022 : “…हा सर्व मोदींचा करिष्मा”, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
-
भारत, पाकिस्तान ऑस्ट्रेलियात भिडणार?…पहा ऑस्ट्रेलिया बोर्ड काय म्हणालेय
-
UP Results 2022 : विरोधक अगोदरच आपल्या पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार धरत आहेत- सिद्धार्थ नाथ सिंग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
