🕒 1 min read
उत्तर प्रदेश : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज (१० मार्च) जाहीर होणार असून यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे. तसेच संपूर्ण देशाचे या निकालांकडे लक्ष लागले असून सकाळी ८ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश मध्ये २३६ जागांसह भाजप आघाडीवर असून समाजवादी पक्ष १११, बसपा ६,काँग्रेस ४ आणि इतर ४ जागांवर आघाडीवर आहेत.
या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री सिद्धार्थ नाथ सिंग यांनी विरोधक अगोदरच आपल्या पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार धरत असल्याचे म्हंटले आहे. यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना सिंग म्हणाले की, ‘ईव्हीएमच्या संशयास्पद हालचालींवर प्रशासन कारवाई करत असताना विरोधक विनाकारण गोंधळ घालत आहे. ते आधीच ईव्हीएमला पराभवासाठी जबाबदार धरत आहेत.’
दरम्यान, यापूर्वी वाराणसीमधील ईव्हीएम मशीन्सची जागा बदलण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन अखिलेश यादव यांनी प्रश्न उपस्थित करत भाजपवर निवडणुकीच्या मतमोजणीत गडबड करण्याचा आरोप केला होता. याला अनुसरून पुन्हा एकदा सपाने या वेबकास्टींगची मागणी केली होती. परंतु निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावले.
महत्वाच्या बातम्या:
-
Election Result 2022 : ज्याच्या ताब्यात उत्तर प्रदेश त्याच्या ताब्यात केंद्र सरकार- रावसाहेब दानवे
-
UP Result 2022 : युपीत भाजपला बहुमत; डबल सेंचुरी करत आघाडीवर
-
‘आमचं राजकारण नकलांवर नाही तर…’ ; राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांचा टोला
-
“बऱ्याच वर्षांपासून मनात होते की, डोंबिवलीत…” रहाणेने शेअर केला खास व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
