🕒 1 min read
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या केसमध्ये अडकवण्यासाठी कशा पद्धतीने षडयंत्र रचलं जात होतं. याचे पुरावे त्यांनी विधानसभेत सादर केले. सरकारी वकील, पोलीस, मंत्री आणि नेते कशा पद्धतीने या षडयंत्राचा भाग होते, हे देखील त्यांनी सांगितले. यामध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल गोटे यांचा देखील सहभाग होता, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
दरम्यान अनिल गोटे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांवर जोरदार पलटवार केला आहे. अनिल गोटे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस खोटा आणि लबाड माणूस आहे, हे मला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी सभागृहात केलेल्या आरोपांमुळे मला धक्का बसला नाही.”
गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी सरकारी वकीलांकडे गेल्याच्या व्हिडीओ क्लिपवर बोलतांना गोटे म्हणाले, “मी चव्हाण वकीलांकडे माझी केस देण्यासाठी गेलो होतो. आता यांच (देवेंद्र फडणवीस) मन खातं दोन चांगली माणसं एकत्र आली की आपल्याविरुद्ध काहीतरी कटकारस्थान शिजतं, असं तिथं काही झालं नाही. ३ तारखेची ती क्लिप आहे. रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप केले. यांनी पण फोन टॅप केले. हे कायदेशीर आहे का?, कुणाचे खासगी व्हिडीओ घेणे बरोबर आहे का?”
अनिल गोटे यांचा या वकिलांशी प्रत्यक्ष संवाद आहे. फोन कॉल्स आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या भेटी-बैठकी याचे तपशील देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले, यावर अनिल गोटे म्हणाले, “मी कुणाचही ऐकत नाही. देवेंद्र फडणवीस यांना विचारा त्यांच तरी ऐकत होतो का, मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही. मला जे पटतं ते मी करतो. मी चव्हाण वकीलांना भेटलो म्हणजे कुठल्या बाईला भेटलो का ? कमाल करत आहात”
“माझ्यावर आरोप होत आहेत कारण मी देवेंद्र फडणवीसांची उतरवून टाकतो. मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. त्यांनी माझं नाव घेतलं नसतं तर मला त्यांच्यावर खुलासा करता आला नसता. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असतांना गृहखात्याचा गैरवापर केला आहे,” असा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
