🕒 1 min read
मुंबई: सध्या राज्यात सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे. आधी किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांवर आरोप केले आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधलाय. वाधवान यांच्यासोबत किरीट सोमय्या यांचे व्यावहारिक संबंध असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. तसेच ईडीचे पाचवे एजंट, अशी टीका देखील केली. राऊतांच्या आरोपांना प्रतिउत्तर देताना किरीट सोमय्या म्हणालेत कि, “माझा वाधवान यांच्याशी काडीचाही संबंध नाही. राऊतांना मुंबई पोलिसांनी दोन पानांचं उत्तर दिलेलं आहे. मी कोणत्याही पत्रकार परिषदेत अधिकृत कागद हातात असल्याशिवाय कोणतीही गोष्ट बोललेलो नाही. पण हे फक्त नौटंकी करत आहेत”.
“..उद्धव ठाकरेंची हिंमत का नाही?”
शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत म्हणाले की नवाब मलिक मुस्लीम आहेत म्हणून त्यांना अटक केली. आता उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला नाही, तर आता उद्धव ठाकरेंनी म्हणावं की ते न्यायाधीश ईडीचे पाचवे एजंट आहेत. उद्धव ठाकरेंमध्ये एवढी हिंमत असेल तर सामनामध्ये अग्रलेख लिहावा त्यांनी की ते न्यायाधीश ईडीचे पाचवे एजंट आहेत. तिथे तर किरीट सोमय्या न्यायाधीश नाही ना? १९ बंगल्यांच्या बाबतीत बोलायची हिंमत का नाही उद्धव ठाकरेंची?, असा सवाल देखील सोमय्यांनी उपस्थित केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
