🕒 1 min read
मुंबई: सध्या राज्यात सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे. यातच आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपा आमदार गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी सरकारी वकील आणि एसीपी यांना हाताशी धरून सरकारने षडयंत्र रचल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांना केला आहे. यावेळी फडणवीर म्हणाले की, “देशामध्ये लोकशाही असून महाराष्ट्र पुरोगामी राज्य असल्याचे आपण म्हणतो. तसेच महाराष्ट्राची पोलीस व्यवस्थाही प्रगल्भ आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांचा मला अभिमान आहे. पण अलिकडच्या काळात पोलीस दलाचा गैरवापर सरकारडून वाढला आहे. सरकारच षडयंत्र करत असेल तर लोकशाहीला अर्थ उरत नाही. महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीमध्ये आपण एकमेकांचे विरोधक आहोत पण शत्रू नाहीत.”
विशेष म्हणजे यावेळी फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांना सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असणारा पेनड्राईव्हही सुपूर्द केला. “गिरीश महाजनांच्या संदर्भात पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात सरकार कशा प्रकारचे कटकारस्थान करत आहे, ते मी या पेनड्राईव्हमध्ये दिले आहे. हा पेनड्राईव्ह मी अध्यक्षांना सुपूर्त करत आहे. २०१८मध्ये मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या भोईटे गटाच्यावतीने गिरीष महाजनांचे स्वीय सहाय्यक रामेश्वर यांनी पाटील गटाच्या व्यक्तीचे अपहरण केले. त्यानंतर महाजनांचा फोन आला आणि त्यांनी धमकी दिली. अशा प्रकारची बनावट केस तयार करण्यात आली. त्या प्रकरणात गिरीष महाजनांना मोक्का लावण्यात यावा, असे सांगून कागदपत्रे तयार करण्यात आली,” असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकावर केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
