Share

IT, ED ला आतापर्यंत 50 नावं पाठवली, त्यांनी चौकशी का केली नाही? संजय राऊतांचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात दुसरी पत्रकार परिषद घेतली. संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली. भाजपचे लोक काय मुंबईतील रस्त्यावर हातात कटोरा घेऊन भीक मागतात का? अशा शब्दात प्रश्न उभा करून संजय राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. यासह IT, ED ला 50 नावं पाठविली होती त्यांनी चौकशी केली नाही. असाही आरोप राऊतांचा केला.

IT, ED ला आतापर्यंत 50 नावं पाठवली पण त्यांनी चौकशी केली नाही. ईडी किंवा आयटीला एक जबाबदार खासदार बोलतोय, याबाबद चौकशी व्हावी असं त्यांना का वाटत नाही? सध्या फक्त महाराष्ट्र आणि बंगालमध्ये ठराविक लोकांना का टार्गेट केलं जात आहे. या ठिकाणीच का धाडा टाकत आहेत? असा प्रश्नही संजय राऊत यांनी केला. दुसरे कोणी मिळत नाही का? फक्त शिवसेना किंवा टीएमसीच… का? हे सरकारवर दबाव टाकून सरकार पाडण्याचा घाट आहे. असा संजय राऊत यांनी आरोप केला आहे.

पत्रकार परिषद घेण्याआधी तसेच संजय राऊत यांनी तपास यंत्रणा राजकीय विरोधकांची कोंडी करून त्यांना अडचणीत आणत आहेत, असे सांगितले होते. या यंत्रणा भाजपच्या राजकारणाला हातभार लावतात. ही सर्व माहिती पत्रात आहे आणि टप्प्याटप्प्याने बाहेर येईल. आज त्यातला पहिला भाग मी बाहेर काढणार आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!