🕒 1 min read
नवी दिल्ली : वेस्टइंडीज विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचे दिग्गज जलदगती गोलंदाज जेम्स एंडरसन आणि स्टुअर्ड ब्रॉड खेळणार नाहीत. परंतु इंग्लंडचा कर्णधार जो रूट त्यांच्या या न खेळण्याने चिंतीत नाही.
स्काय स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार तो म्हणाला की, “या दोन गोलंदाजांच्या जागेवर ज्या नवीन गोलंदाजाना संधी देण्यात आली आहे. ते या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. या दोन्ही खेळाडूंना संघात खूप इज्जत आहे. या मालिकेत आम्ही खूप उत्साहाने मैदानात उतरणार आहोत.
जेव्हा तुम्हाला कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळते, तेव्हा तुम्ही त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करत असता. मला पूर्ण विश्वास आहे की, या दोघांच्या बदल्यात जे खेळाडू आले आहेत. ते या संधीचा पूर्ण फायदा घेतील. त्यांना या सामन्यात दाखवून दयायचे आहे की ते या सामन्यात काय करू शकतात.”
वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यात ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यातील पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडने आपला संघ काल जाहीर केला आहे. या संघात त्यांनी बरेचसे बदल केले आहेत. पहिल्या सामन्याला आज पासून सर विवियन रिचर्ड्स स्टेडियम सुरुवात होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
