🕒 1 min read
मुंबई: न्यूझीलँडचा संघ आयपीएल स्पर्धेच्या काळात नेदरलँडसोबत मालिका खेळणार आहे. अशात किवी संघात आयपीएलचे प्रमुख खेळाडू असल्यामुळे ते लीग खेळणार कि नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. मात्र आता न्यूझीलँड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी पुष्टी केली आहे की आयपीएलचा भाग असलेले किवी खेळाडू स्पर्धा खेळणार आहेत.
न्यूझीलँडचे कोच गॅरी स्टीड (Gary Stead) यांनी सांगितले की, “काही खेळाडू नेदरलँड विरुद्ध मालिकेत संघाचा भाग नसतील. ते IPL संपल्यानंतर इंग्लडविरुद्ध होणाऱ्या मालिकेत संघाचा भाग बनतील. ३० मे ला आयपीएल संपल्यानंतर काही दिवसातच इंग्लंड विरुद्ध सामना आहे. खेळाडूंना वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये पटकन अॅडजस्ट करण्याची सवय आहे. तर काही अडचण येणार नाही.”
आयपीएल २०२२ स्पर्धेत न्यूझीलँडचे केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट, मिचेल सँटनर, डेव्हॉन कॉनवे, डॅरिल मिशेल, लॉकी फर्ग्युसन, टिम साउथी, अॅडम मिल्ने, टिम सेफर्ट, जेम्स नीशम, फिन ऍलन आणि ग्लेन फिलिप्स हे १० संघाचा भाग आहेत. आयपीएल २६ मार्चपासून सुरु असून त्याचा अंतिम सामना २९ मे ला होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी खालच्या पातळीचं राजकारण केलं; मुरलीधर मोहोळ यांचा आरोप
- बोगस किटकनाशकांमधून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक
- जर्मन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवार पासून सरुवात; सिंधू, श्रीकांत यांच्या कामगिरीकडे लक्ष
- “तुमच्या खाजगी कार्यक्रमाची कधी CD निघाली तर…”, धनंजय मुंडेंना निलेश राणेंचा जोरदार टोला
- नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना 50 हजार रुपये लवकरच देण्यात येणार – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
