🕒 1 min read
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी आज पुन्हा एकदा ट्वीट करत राजकारणात चर्चा घडवली आहे. उद्या चार वाजता शिवसेना भवनात शिवसेना पत्रकार परिषद असणार असल्याची माहिती त्यांनी ट्वीट करत दिली आहे. आता ते पुन्हा एकदा काय खुलासा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी संजय राऊत यांनी १५ फेब्रुवारी रोजी शिवसेनेची पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांचा निकॉन कंपनीसंबंधी घोटाळा, तसेच भाजप नेते मोहित कंबोज, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप लावले होते.
कल शाम चार बजे शिवसेना भवन में प्रेस कॉन्फ्रेंस करूँगा।
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/cGyOHaGGg4
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 7, 2022
दरम्यान आता उद्याच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत काय खुलासा करणार याच्या चर्चा आता राजकारणात रंगल्या आहेत. त्यामुळे उद्याच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
