Share

मोहाली कसोटी सामन्यात जडेजाची इच्छापूर्ती झाली ; जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मोहाली येथे झालेल्या पहिल्या कसोटी मालिकेत रवींद्र जडेजाने खऱ्या अर्थाने अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या डावात फलंदाजी करताना शतक केले तर गोलंदाजी करताना ५ विकेट्स घेतल्या आहे. यानंतर त्याचा एक जुना मुलखातीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात त्याने अशी कामगिरी करायची इच्छा व्यक्त केली होती.

एका जुन्या मुलाखतीत जडेजाला (ravindra jadeja) विचारण्यात आले होते कि एक असा कोणता रेकॉर्ड आहे जो तू तुझ्यावर नोंदवण्यास उत्सुक आहे. त्यावर जडेजाने तात्काळ ‘एकाच डावात शतक आणि पाच विकेट घेणे’ असे सांगितले होते. मोहाली कसोटी सामन्यात त्याने हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.एकाच डावात शतक आणि पाच विकेट (फायफर) घेत तो काही महान अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. या यादीत आधी केवळ दोन भारतीय होते. विनू माकड (vinu makand) (१९५२) मध्ये इंग्लंड विरुद्ध आणि पॉली उमरीगर (polly umragir) (१९९२) मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध. तसेच विदेशी खेळाडूंमध्ये डेनिस ऍटकिन्सन, गॅरी सोबर्स (gary sobers) आणि मुश्ताक मोहम्मद यांचा या यादीत समावेश आहे.

दरम्यान, मोहाली कसोटी सामन्यात तो पाच विकेट्सवर थांबला नाही. त्याने दुसर्‍या सत्रापर्यंत दुसर्‍या डावात आणखी तीन विकेट्स जोडल्या. १५० हुन आदिक दहावा करत १० विकेट्स घ्यायची जडेजाकडे संधी होती, मात्र तो पूर्ण करू शकला नाही. जडेजाने बॅटने केलेल्या फटकेबाजीने आणि चेंडूसह धमाकेदार फिरकीने श्रीलंकेला अस्वस्थ केले आणि त्यांना फॉलोऑनला सामोरे जावे लागले. भारताने पहिला कसोटी सामना जिंकत दोन सामन्याच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!