🕒 1 min read
बुलढाणा – बुलढाण्यातील खामगाव जवळ हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. खामगाव शहरानजीकच्या घाटपुरी देवी जवळ दुचाकीस्वार पती पत्नी आपल्या ८ महिन्यांच्या बाळाबरोबर जात होते. पुढे स्पीड ब्रेकर असल्याने दुचाकीस्वाराने दुचाकीचा वेग कमी केले. त्याच वेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने या दुचाकीला धडक दिली. या अपघातात एक ८ महिन्यांच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला तर आई आणि वडील गंभीर जखमी झालेत.
https://youtu.be/Igk5hN5OlOQ
जळगाव जामोद तालुक्यातील खणदावी येथील आंनद चांडक हे आपली पत्नी दुर्गा चांडक आणि हंस चांडक या आपल्या ८ महिन्यांच्या बाळासोबत खामगाव येथील रुग्णालयात दाखल असलेल्या एका नातेवाईकाला पाहण्यासाठी आले होते. सायंकाळी ते घरी परतत असताना शहरातील घाटपुरी देवी जवळील स्पीड ब्रेकरवर चांडक यांनी आपल्या दुचाकीचा वेग कमी केला होता. त्याच वेळी मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. जखमींना नागरिकांनी रुग्णालयात हलविले. दरम्यान महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून, लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
