Share

कल्याणमध्ये आढळला चित्रांग नायकूळ जातीचा दुर्मिळ साप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कल्याण चिंचपाडा येथे एका दुकानात छोटासा साप आढळून आला. या सापाबद्दलची माहिती वाॅर फाऊंडेशनला हेल्पलाईनवर मिळाली. त्यानंतर सर्पमित्रांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत या सापाला पकडलं व हा साप तात्काळ वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला. विशेष म्हणजे हा साप चित्रांग नायकूळ जातीचा होता. या जातीचे साप अत्यंत दुर्मिळ असून यापूर्वी 2020 मध्ये कळवा येथे या सापाची नोंद झाली होती.

कल्याणमध्ये पहिल्यांदाच या जातीचा साप आढळून आल्याच वाॅर फाऊंडेशनच्या सर्पमित्रांनी सांगितले. सध्याच्या वाढत्या तापमानामुळे साप मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात आणि नागरी वस्तीत येतात. अनेकदा नागरिक भीतीपोटी या सापांना मारतात तर अनेकदा नागरिक या सापांशी छेडछाड करतात त्यामुळे सर्पदंशाच्या घटना घडतात. सर्प व माणसांचा संघर्ष टाळण्यासाठी वाॅर फाऊंडेशनचे प्राणी मित्र आणि वन विभाग कार्यरत आहेत. वॉर फाउंडेशनने आतापर्यंत अनेक सापांना जीवनदान दिल आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!