Share

आजपासून राज्यातील या भागात मुसळधार पाऊस; हवामान खात्याकडून अलर्ट जारी!

Published On: 

मुंबई : सध्या राज्यातील अनेक भागात हरभरा आणि गहू काढण्याची तयारी सुरू आहे. या कामात पाऊस अडथळा आणू शकतो. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 7 ते 10 तारखेपर्यंत पाऊस हजेरी लावणार आहे. विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या ठिकाणी पडणार पाऊस –

महाराष्ट्र, गुजरात, पूर्व राज्यस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात दिनांक 7 ते 10 या कालावधीत विजांच्या गडगडाटासह काही भागात तुरळक पाऊस हजेरी लावणार आहे. आपल्या काढणी झाल्या असतील तर लवकर मळणी करून घ्या, अशा सूचना शेतकऱ्यांना दिल्या आहेत.

7 मार्च रोजी या ठिकाणी पाऊस –

आज नंदुरबार, धुळे, नाशिक, औरंगाबाद, आणि जळगाव या भागाला हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. या भागात जोरदार पाऊस कोसळणार असे सांगितले आहे. तसेच पालघर, ठाणे, पुणे व अहमदनगर या ठिकाणी तुरळक पाऊस पडणारी आहे असे सांगितले.

८ व ९ मार्च रोजी –

धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बुलढाणा, परभणी, जालना, बीड, परभणी, वाशीम, हिंगोली,अकोला , अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस कोसळणार.

१० मार्च रोजी –

बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, धुळे या भागात हलका पाऊस पडणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!